महाकाली प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१९ फेब्रुवारी):-महाकाली प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाईपलाईनरोड येथील वाणी नगरमध्ये उत्साहात सादरी करण्यात आली. यावेळी महाकाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन वाणी व उपाध्यक्ष संतोष वाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष मोहन वाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्याबाबत सविस्तर असे विवेचन केले.व महाराष्ट्र शासनाने अंगिकारलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.यावेळी राम वाणी,सचिन पोटे,जालिंदर शिंदे,विशाल वाणी,तया शिंदे,भगवान वाणी,लाजरस अल्हाट,व सेलटॅक्स कॉलनी शिवाजीनगर,संगीत कॉलनी,तागड वस्ती,येथील महिला,पुरुष,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.