Maharashtra247

धनगर समाजाचा वधू-वर मेळावा संपन्न

 

नगर प्रतिनिधी (दि.१९ फेब्रुवारी):-गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे.याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.त्यात विधान सभेतही या विषयावर चर्चा झाली आहे.राज्य सरकार त्यादृष्टीने कार्यवाही करत आहे.धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे.याबाबत आपणही भुमिका जाहीर केली होती, सर्वानुमते निर्णयानुसार नगरचे नामांतर करण्यास आपला पाठिंबा राहणार आहे.माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही.परंतु सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ,असे मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे गंगा लॉन्स, निर्मलनगर,अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी धनगर समाजाचा वधू वर सूचक मेळावा नगर येथे आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी आमदार अ‍ॅड.रामहरी रुपनर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे,मा.नगरसेवक निखिल वारे,वधू वर सूचक मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड,प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ,इंजि. रंगनाथ भोंडवे,दत्तात्रय गावडे,निशांत दातीर,सचिन डफळ,काका शेळके,शरद धलपे,सूर्यकांत तागड,ज्ञानेश्वर घोडके,विजय शिपणकर,डॉ.नामदेव पंडित, दशरथ लांडगे,राजेंद्र पाचे,पी.आर. शिंदे,वसंतराव दातीर,सोपान राहींज आदी मान्यवर उपस्थित होते.खा.विखे पुढे म्हणाले, धनगर समाजाच्या उन्नत्ती आणि प्रगतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातील संघटनांनी प्रयत्न करावेत. आजच्या वधू-वर मेळाव्या माध्यमातून समाजाचे होत असलेले संघठन हे कौतुकास्पद असेच आहे.संघटनेशिवाय कोणतही कृती प्रत्यक्षात येत नाही, त्यासाठी समाजाने संघठन मजबूत करुन समाजाचा विकास साधावा,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिष्ठानच्या सभामंडप व इतर विकास कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यानी केली.यावेळी आ.रामहरी रुपनर,म्हणाले की धनगर समाजाचा इतिहास आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे.अहमदनगर जिल्हाला त्यांचे नाव देण्याचा प्रास्ताव आहे,नामांतर होण्याचा प्रयत्न केला जात आहे.ही समाजाच्यादृष्टीने गौरवास्पद बाब आहे,त्यामुळे जगाच्या पटलावर नगरचे नाव अहिल्याबाई होळकर म्हणून कोरले जाणार आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.याप्रसंगी राजेंद्र तागड यांनी धनगर समाज सेवा संघाच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करुन समाजातील पालकांसाठी वधू-वर निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याच बरोबरच समाजातील मान्यवरांचे विचार पोहचविण्याचे काम या मेळाव्याद्वारे झाले असल्याचे सांगितले.या वधू-वर मेळाव्यात जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातीलही वधू-वर, पालक उपस्थित होते. वधू-वर नोंदणी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या समाजातील मान्यवरांचाही गौरव मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.

You cannot copy content of this page