महिलांच्या प्रश्नांनावर सातत्याने लढा देणाऱ्या मानसीताई म्हस्के यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या महिला आघाडी शहर अध्यक्षपदी निवड
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने शहरात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.पक्षाचे पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांच्या आदेशान्वये आणि जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली,महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या धडाडीच्या नेत्या मानसीताई म्हस्के यांची पक्षाच्या ‘महिला आघाडी शहर अध्यक्षपदी’ सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.मानसीताई म्हस्के यांनी आजवर महिलांचे प्रश्न,त्यांचे न्याय्य हक्क आणि अन्यायाविरुद्ध नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.मानसीताईंच्या निवडीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.अॅड.अविनाश थिट्टे (राज्य उपाध्यक्ष),सुरेश शिनगारे (राज्य सचिव),वैभव लोखंडे (राज्य सहसचिव),सुनील खरात (मराठवाडा उपाध्यक्ष),सचिन नवगिरे (मराठवाडा कार्याध्यक्ष),रणजीत मनोरे (शहराध्यक्ष) व दिनेश गवळे (जिल्हाध्यक्ष) तसेच अर्शद लखपती,प्रकाश घोरपडे, रवि मोरे, संजय जाधव, संतोष उनवणे, राजकुमार अमोलिक, सुरेश कांबळे, अशोक तुपे, सतीश प्रधान, शेख फईम, प्रमोद देहाडे, भीमराव गाडेकर, अनिस गंगापूरकर, प्रदीप धनेधर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या निवडीनंतर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद साजरा होत आहे. मंगला पंदिकर, कल्पना जमधडे, अरुणा साठे, अलका कांबळे, आम्रपाली डोंगरे, रोहिणी जमधडे यांनी मानसीताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
