अहिल्यानगरमध्ये ‘ट्रॅव्हल जिहाद’ वरून रणकंदन..! बसमधील प्रवासी महिलेच्या विनयभंगा प्रकरणी आ.संग्राम जगताप आक्रमक..भरउन्हात हिंदू बांधव भगिनींचा रस्ता रोको
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर-पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम वाहकाने (कंडक्टर) ने हिंदू महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या ‘ट्रॅव्हल जिहाद’ च्या नव्या प्रकारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत,शेकडो नागरिकांसह कायनेटिक चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.भरउन्हात सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार,नगर-पुणे मार्गावरील शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम कंडक्टरने एका हिंदू प्रवासी महिलेचा विनयभंग केला.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.हा प्रकार समोर येताच आमदार संग्राम जगताप यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने तातडीने आंदोलनाचे हत्यार उपसले.
आज सकाळी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली कायनेटिक चौकात रस्ता अडवण्यात आला.या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू महिला आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.जोपर्यंत संबंधित नराधम कंडक्टरवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याची अधिकृत प्रत हातात पडत नाही,तोवर रस्त्यावरून हटणार नाही,” अशी ठाम भूमिका आ.जगताप यांनी घेतली.शेवटी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याची प्रत दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ.संग्राम जगताप यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रहार केला.ते म्हणाले नगरमध्ये लव्ह, लँड आणि व्होट जिहादनंतर आता नाशिकमध्ये ‘आयटी जिहाद’ आणि नगरमध्ये ‘ट्रॅव्हल जिहाद’ सुरू झाला आहे.हा आपल्या भगिनींच्या सुरक्षिततेवर मोठा घाला आहे.
“महिलांनी बस किंवा रिक्षामध्ये प्रवास करताना चालक आणि वाहक हिंदू आहेत की नाही,याची खात्री करूनच प्रवास करावा.या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला सारून महायुतीचे सर्व घटक पक्ष एकवटलेले दिसले.यावेळी भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिसरात ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ आणि ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणांनी कायनेटिक चौक दणाणून गेला होता. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
