काकडवाडीत वडाच्या झाडाचे रोपण करत वटसावित्री पौर्णिमा साजरी, डॉ.जयश्रीताई थोरात यांचा पुढाकार..!!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी ओढ्यालगत आज 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गावातील महिला भगिनींच्या शुभहस्ते वडाच्या झाडाचे रोपण करत वटसावित्री पौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
वटसावित्री पौर्णिमेच्या पावन निमित्ताने काकडवाडी येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या वडाच्या रोपाचे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला.विशेष म्हणजे,दोन वर्षांपूर्वीही संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून वडाचे रोप लावण्यात आले होते.आज ते झाड जोमाने वाढत असून,वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचेही हे प्रेरणादायी उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे.
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये वटसावित्रीच्या निमित्ताने वडाच्या रोपांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
झाडे लावणे ती जगवणे हीच खरी जबाबदारी आहे.कारण झाडे जगली तरच पर्यावरण टिकेल,निसर्ग समृद्ध होईल आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहील असा विश्वास काकडवाडी गावातील महिलांनी व्यक्त केला आहे.
