तळेगावात आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पाझर तलाव दुरुस्ती कामास प्रारंभ..!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील तळेगाव काकडवाडीच्या सरहद्दीतील बंधाऱ्याचे तथा पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास आज शनिवार दिनांक 27 जून २०२६ रोजी सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला असुन संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ पा.यांच्या निधीतून लघुपाट बंधारे विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, यांच्या जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत तळेगाव येथील पाझर तलाव दुरुस्तीचा उद्घाटन शुभारंभ मान्यवर व शेतकऱ्यांच्या शुभहास्ते संपन्न झाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार अमोलभाऊ खताळ पा.यांचे स्नेही उद्योजक उत्तमभाऊ दिघे यांनी दिले आहे.
पाझर तलाव दुरुस्ती कामाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायतचे सदस्य बाळासाहेब दिघे,डॉ.संतोष डांगे,राजेंद्र सोनवणे,डॉ.सुहास आभाळे,दत्तू दिघे,उत्तम दिघे,अर्जुन शिरसाठ,जनार्धन कासार,लक्ष्मण ढवळे,अशोक मुळे,रोहित शिंदे,संतोष गुंजाळ,संतोष मुळे,सुदाम ढवळे राजेश दिघे,गणेश बोखारे आदींसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाझर तलावाच्या कामामुळे बंधाऱ्याची खोलीकरण झाल्याने त्यात पावसाचे पाणीसाठा वाढल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगला फायदा होईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते उत्तमभाऊ दिघे यांनी व्यक्त केला आहे..
