Maharashtra247

अखेर उपचारादरम्यान अंकुश चत्तर यांचा मृत्यू;त्या नगरसेवकासह पाच मुख्य आरोपी गजाआड

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७जुलै):-पाईपलाईन रोड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात शनिवारी (दि. १५) रोजी रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला.

 

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी सावेडी उपनगरातील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी,नगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले.

You cannot copy content of this page