सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण (अ ब क ड) निर्मितीसाठी पुणे ते मुंबई “दवंडी यात्रा”
प्रतिनिधी (दि.१७ जुलै):-सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण (अ ब क ड) निर्मितीसाठी पुणे ते मुंबई “दवंडी यात्रा” ही यात्रा १८ जुलै रोजी सकाळी १० वा.क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक संगमवाडी पुणे येथून दवंडी यात्रेला सुरुवात होणार असून 20 जुलै 2023 रोजी सायंकाळी ४ वाजता आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम छोट्या मोठ्या संघटना हया दवंडी यात्रेला हजेरी लावणार आहेत व सहभाग घेणार आहेत.या यात्रेतील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
१) अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण(अ ब क ड) करणे
२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ ण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टि) स्थापन करणे
३) क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करणे
४) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नऊ वर्षाचे थकित निधी देऊन महामंडळ पूर्ण क्षमतेने चालू करणे
५) साहेब संजय भाऊ ताकतोडे यांना संपूर्ण शासकीय मदत देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करणे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ व वाचनालय संस्थापक अध्यक्ष प्रकाश भास्कर पाटोळे यांनी बहुजन समाजाने एकत्रितपणे येऊन हा लढा लढण्याचे आवाहन केले आहे.