अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ जुलै):-घरफोडी,चोरी करणारा व तब्बल 22 गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी कर्जत येथुन गावठीकट्टा व जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कर्जत परिसरात फिरुन अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणा-या आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक कर्जत परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना दि.23 जुलै रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,कर्जत मिरजगांव जाणारे रोडवर लष्कर वस्ती,बहिरोबावाडी, ता.कर्जत येथे एक 20 ते 22 वर्षे वयाचा पांढऱ्या रंगाचा नक्षी असलेला शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम बेकायदेशिररित्या गावठीकट्टा कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने काळे रंगाचे विना नंबर मोटार सायकलवर फिरत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच कर्जत-मिरजगांव रोडने जावुन बातमीतील वर्णनातील इसमाचा शोध घेताना,संशयीत इसम मोटार सायकल रस्त्याचे कडेला लावुन त्यावर बसलेला दिसला.पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता,त्याने त्याचे नाव 1) भगवान ईश्वर भोसले वय 22, रा.बेलगांव,ता.कर्जत असे सांगितले.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत गावठी कट्टा, जिवंत काडतुस,सोन्याचे दागिने,रोख रक्कम व मोटार सायकल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे नमुद मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्याने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे हे विक्री करीता आणल्याची माहिती दिली.तसेच त्यांचेकडे वरील सोन्याचे दागिने व रोख रकमे बाबत विचारपुस केली असता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे 2) संदीप ईश्वर भोसले (फरार), 3) विशाल उध्दव काळे (फरार) दोन्ही रा. बेलगांव,ता.कर्जत यांचे सोबत लक्ष्मीनगर,ता.श्रीगोंदा व वडगांव तनपुरा,ता.कर्जत येथुन घरफोडी चोरी करुन आणले असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जातुन 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा,1,200/- रुपये किंमतीचे चार जिवंत काडतुस, 60,000/- रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,18,000/- रुपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाची कर्णफुले व मणी 10,000/- रुपये रोख व 1,00,000/- रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची मोटार सायकल असा एकुण 2,29,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.व आरोपी विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं.468/2023 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे भगवान ईश्वर भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात दरोडा,दरोडा तयारी,घरफोडी व चोरीचे एकुण 22 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,विजय वेठेकर,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले, विशाल दळवी,भिमराज खर्से, संतोष खैरे,पोहेकॉ/भाऊसाहेब काळे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,अमोल कोतकर यांनी केलेली आहे.
