अहमदनगर प्रतिनिधी(दि.२४ जुलै):-पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील जुगार अड्डयावर छापा घालून १२ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.मोबाईल,रोकड,वाहने असा एकूण ४ लाख ६२ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बारा जणांना अटक करण्यात आली असून पोकॉ/ शिवाजी ढाकणे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरन ७५६/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम (१२) आ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या जुगार अड्ड्यावर रेड करण्यात आली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील,यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार अतुल लोटके,संतोष लोंढे,ज्ञानेश्वर शिंदे,शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव,जालिंदर माने,रोहित मिसाळ,बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाट,बाळू खेडकर यांनी केली आहे.
