अहमदनगर प्रतिनिधी (दि.२४ जुलै):-नगर तालुक्यातील वाळकी येथील खुनाच्या व खंडणीच्या गुन्ह्यातील मागील तीन महिन्यापासून फरार असणारा आरोपी विश्वजीत कासार याचा हस्तक अशोक उर्फ सोनू गुंड याला जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे अशोक उर्फ सोनू गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केडगाव परिसरामध्ये जावून सापळा लावून थांबा असा आदेश पथकाला दिल्याने सदर पथक हे केडगाव परिसरामध्ये जावून सापळा लावून थांबले असता थोडयाच वेळामध्ये गुन्हयातील आरोपी हा केडगाव परिसरामध्ये संशयीतपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला सदर पथकाची खात्री होताच त्यास ताब्यता घेवून नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ सोनू गुंड (वय 29 वर्ष रा.वाळकी ता.जि.अहमदनगर) असे असलेचे सांगितले.त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यास न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 4 दिवस पोलीस कस्टडी दिली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक,नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले,यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/ शिशिरकुमार देशमुख,पोउनि/युवराज चव्हाण,पोहेकॉ/सुभाष थोरात,पोकॉ/कमलेश पाथरुट,संभाजी बोराडे,राजू खेडकर,विक्रांत भालसिंग यांचे पथकाने केलेली आहे.
