अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जुलै):-दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुसासह भिस्तबाग महालाजवळ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,राखाडी रंगाचे इरटीगा कारमधील काही इसम अहमदनगर शहर परिसरात कोठेतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने घातक हत्यारे घेवुन कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महल रोडने येत आहेत.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचा पथकास सुचना दिल्या व पथकास रवाना केले.पाथक हे भिस्तबाग महला जवळ जावुन ताब्यातील वाहने महालाचे बाजुस आडोशाला अंधारात उभी करुन,सापळा लावुन थांबलेले असताना थोड्याच वेळात एक राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर रोडने महालाकडे येताना दिसली.पथकाची खात्री होताच चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी थांबविली. वाहनातील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) नयन राजेंद्र तांदळे वय 29,रा.पवननगर,पाईपलाईन रोड,अहमदनगर, 2) लियाकत जाफर शेख वय 36,रा.जेऊर बायजाबाई,ता. नगर, 3) अमोल लक्ष्मण रणसिंग वय 35, रा. केडगांव, ता.नगर, 4) धुराजी नामदेव महानुर वय 25, रा.आष्टी, जिल्हा बीड व 5) बजरंग नारायण मिश्रा वय 35, रा. भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.संशयीतांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 36,500/- रुपये किंमतीचा गावठीकट्टा व तीन जिवंत काडतुस, 1,000/- रुपये किंमतीचा एक कोयता, 500/- रुपये किंमतीचे बटनाचे दोन चाकु, 56,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सात मोबाईल फोन,लाकडी दांडके व 4,00,000/- रुपये किंमतीची एक इरटीगा कार असा एकुण 4,94,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याबाबत विचारपुस करता त्यांनी कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1034/23 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 3/25, 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, पोहेकॉ/मनोहर गोसावी,रविंद्र पांडे,देवेंद्र शेलार,सुरेश माळी,पोना/विशाल दळवी, संतोष लोढे,पोकॉ/सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे,विजय धनेधर व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे.
