पाथर्डी प्रतिनिधी:-पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे शहरामध्ये रात्रगस्त व कोंबिंग ऑपरेशन करत असताना पाथर्डी शेवगाव रोड मधुबन हॉटेल समोर एक चारचाकी टोयोटा कंपनीची गाडी संशयितरित्या मिळून आल्याने तिची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 30 हजार दोनशे चाळीस रुपयांचे रत्नाछाप तंबाखूचे पॅक बंद 80 पुडे व अठरा हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू आढळून आल्याने जितेंद्र नरेंद्र चांडक (रा.नवजीवन हॉस्पिटल समोर पैठणगेट जिल्हा छत्रपती संभाजीनगर) व सुभाष अशोक बोर्डे,शुभम रंगनाथ टकले यांच्यावर पोकॉ/भगवान सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरन 772/2023 भादविक 328,188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.
