राहुरी प्रतिनिधी (दि.२५ जुलै):-राहुरी तालुक्यातील महिलेवर अत्याचार करून फरार असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा याला लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आज राहुरी येथे उपोषण सुरू करण्यात आले. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्याला बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यास अद्यापही अटक केलेली नाही.त्याला अटक करण्यात यावी व राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुरी तालुक्याच्या वतीने राहुरी तहसील समोर आज लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.या उपोषणात राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,राज्य उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे,राज्य संघटक गोविंद दिवे,जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे,महिला आघाडीच्या स्नेहल सांगळे, मुस्लिम आघाडीचे आयुब भाई,नंदकुमार सांगळे,अतुल त्रिभुवन,प्रदीप भोसले,रवी पलगडमल,कुमार भिंगारे, गिरीश गायकवाड,न्याय हक्क आंदोलनाच्या यमुना भालेराव, प्रियांका सांगळे,रुकसाना पटेल,सुनील पंडित,सागर साळवे,बाळासाहेब बर्डे,संतोष मोरे,सुनीता थोरात,आशा संसारे,राजू बागुल,नवीन साळवे,संतोष दाभाडे,सलीम भाई शेख,दत्ता खांदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
