अहमदनगर प्रतिनिधी दि.२६ जुलै):-अहमदनगर जिल्हाधिकारी यांना २०२२-२०२३ या वर्षाच्या क्रीडा व युवक कल्याण योजने अंतर्गत लाभधारकांना निधी मंजूर करण्यात येणाऱ्या प्रस्तावासाठी क्रीडा विभागातील गर्जे आणि एजंट यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी २२/०५/२०२३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर यांना तक्रार अर्ज देऊन देखील त्यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई अद्यापपावेतो केलेली नाही.म्हणून वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.योगेश साठे यांनी सांगितले की खेळांना प्रोत्साहित व ते लोकप्रिय करणे व खेळा विषयी त्यांच्यामध्ये नैसर्गिक सहज प्रवृत्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासन त्यांना आवश्यक त्या खेळांच्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील असते.यासाठी राज्य शासन दरवर्षी क्रीडा व युवक कल्याण या उपशिर्षसाठी टीएसपी व ओटीएसपी लाखो रुपयांची नियतव्ययाची तरतूद करीत असते.या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातून दरवर्षी १५०-२०० प्रस्ताव येतात,त्यात काही ठराविक एजंटमार्फत येत असतात.अशाच २०२२-२०२३ या वर्षीचे प्रस्ताव मंजूर करण्याकरिता श्री.गर्जे हे भोर नामक व्यक्तीच्या मार्फत एक एक प्रस्ताव धारकांकडून फोन करून वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना द्यायचे आहे म्हणजे तुमचे प्रस्ताव तात्काळ मंजूर होतील.अधिकाऱ्यांना खुश केले की तुमचे प्रस्ताव डोळे झाकून होतील त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रस्तावमागे ५-१० हजार द्यावे लागतील,नाहीतर तुमचे पुढच्या वर्षीचे प्रस्ताव नामंजूर झालेच समजा अशा आशयाचे बोलणे भोर हा व्यक्ती जिल्हा क्रीडा अधिकारी आणि गर्जे यांचे नाव घेऊन अवैधरीत्या पैसे गोळा करून भ्रष्टाचार करीत असल्याचे आढळून येत आहे.या संदर्भात ऑडियो क्लिप माझ्याकडे आहे या आधारे गर्जे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या बोलण्यातून तथ्य आढळून आले आहे.म्हणून गर्जे यांनी आणि भोर सारखे अज्ञात एजंट यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाची शहानिशा करून,चौकशी करून बोगस प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्था यांच्यावर तसेच गर्जे यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.गर्जे यांच्या टीममध्ये वकील,डॉक्टर असे उच्च शिक्षित एजंट देखील आहेत. विशेष त्यांचेही स्वतःच्या संस्था देखील आहेत.अश्या एजंट मार्फत ५-१० कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.असेही योगेश साठे यांनी सांगितले आहे.सदर तक्रार अर्जाची लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट रोजी जनआंदोलन करण्यात येईल.यावर देखील कारवाई न झाल्यास आपल्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठासमोर सदर ऑडिओ क्लिपच्या आधारे याचिका दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी योगेश साठे यांनी दिला आहे.
