अहमदनगर प्रतिनिधी (दि २६ जुलै):-महिला फिर्यादीस लग्नास नकार दिल्याचे कारणावरुन आरोपी नामे तपेश भोसले व इतर यांनी मनात राग धरून फिर्यादी व तिचे आई वडीलांना शिवीगाळ,दमदाटी व लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.सदर घटने बाबत महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरुन भिंगार कॅम्प पोस्टे गु.र.नं.९८५ / २२ भादविक ३०७,३२६,५०४, ५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्ह्यातील आरोपी नामे ताज्या पाच्या भोसले हा फरार झाला होता. तसेच मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश,अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचे कडील केस क्रमांक १२९/२०२० भादविक ३५४ (ब),३२४, ३२३, ५०४, ५०६, ४३६ सह पोक्सो अॅक्ट कलम ७,८ मध्ये वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी विरुध्द नियमित सुनावणी सुरु असुन आरोपी सुनावणीचे वेळी मा. न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याचे विरुध्द मा. न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढुन,आरोपीस सुनावणीचे वेळी समक्ष हजर ठेवणे बाबत आदेश दिले होते.मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचे आदेश प्राप्त होताच श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खुनाचा प्रयत्न व अजामिनपात्र वॉरंटातील आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/शरद बुधवंत,पोना/ रविंद्र कर्डीले व पोकॉ/ शिवाजी ढाकणे पोना/रोहित मिसाळ,पोना/विशाल गवांदे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे ताज्या पाच्या भोसले रा. यशवंतनगर,डेअरी फार्म, भिंगार,ता.नगर याचा शोध घेवुन आवश्यक कारवाई करणे बाबत सुचना देवून रवाना केले.पथकाने आरोपीचा भिंगार परिसरा कसोशीने शोध घेवून,आरोपी त्याचे राहते घरी यशवंत नगर, डेअरी फार्म,भिंगार,ता.नगर येथे मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे ताज्या पाच्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर,बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा,दरोडा तयारी,जबरी चोरी,गंभीर दुखापत व इतर कलमान्वये एकुण १४ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, व श्री. लअनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
