Maharashtra247

कारगिल लढाईचा अनुभव…आमचा पुनर्जन्मच झाला होता माजी सैनिक/सहाय्यक पोलीस आयुक्त Anty Curruption beureo मुंबई बजरंग चौगुले 

महाराष्ट्र न्यूज संपादक सचिन मोकळ

 

प्रतिनिधी:-कारगिल लढाईचा अनुभव सांगताना माजी सैनिक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त Anty Curruption beureo मुंबई बजरंग चौगुले यांनी सांगितले की,ब्रिगेड सिग्नल कंपनी या युनिट मधून सक्रिय भाग घेतला.तसेच १/११ Gorkha regiment या बटालियन सोबत कारगिल युद्धात मला देश सेवा करण्याची संधी मिळाली होती.लढाई दरम्यान पाकिस्तान सीमेवरील खालशी,दाह,घणासक, यालदोर batalic सेक्टर, बोल्डर्स एरिया,अश्या दुर्गम ठिकाणी कॅप्टन अमोल कालिया,कॅप्टन मनोज पांडे अश्या निधडया छातीच्या,शेर दिल,तरने बांड परमवीर चक्र विजेते,देशप्रेमी,तडफदार, अधिकारी यांचे सोबत खांद्याला खांदा देऊन लढाई करण्याचा योग मला मिळाला. तसेच परमवीर चक्र विजेते फक्त २४ वर्ष वयाचे कॅप्टन मनोज पांडे युद्धात धारातीर्थी पडल्यावर त्यांचे पार्थिव बॉम्ब वर्षाव होत असताना युद्ध भूमीतून बेस कॅम्प कडे,जेथे हेलिपॅड बनवले होते.त्या सुरक्षित स्थळी पोहोचवतांना खांद्यावर घेऊन जाण्याचा सन्मान मला मिलाला आहे. मी धन्य झालो होतो.समुद्र सपाटी पासून १८००० फूट उंचीवर मे महिन्यात ही बर्फ असलेल्या प्रदेशात प्रतिकूल परिस्तिथी मध्ये जीवाची पर्वा न करता,घरची परिस्थिती हालाकीची असून सुद्धा त्यांची फिकीर न करता भारत मातेची शान राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता लढाईत प्राण झोकून दिले होते.कारगिल युद्धात लढलेल्या त्या सर्व सैनिकांच्या बलिदानाचे परिणाम आज देशभरात आनंदोत्सव साजरा करताना दिसतात.ते दिवस आठवल्यावर मन गहिवरून येते.युद्धात बरेच साथीदार शहिद झाले त्यांना मनापासून श्रद्धांजली.काही जखमी झाले अश्या त्या अशांत परिस्थिती मध्ये पण माझ्या जवळच्या कॅमेरात काही सुंदर,हळवी आणी विदारक क्षणचित्रं मी माझ्या फोटोग्राफीच्या शौकमुळे कॅमेऱ्यात कैद केले होते.आजतागायत जपून ठेवले आहेत.आज मन भरून आले शूर सैनिकांची आठवण आली.लढाईत सोबत असलेल्या सर्व माझे सर्व्हिस मध्ये असलेली तसेच निवृत्त झालेल्या जिवलग मित्र आणि अधिकारी वर्ग यांना अभिवादन आणि सलाम.

श्री.बजरंग चौगुले…सहाय्यक पोलीस आयुक्त Anty Curruption beureo मुंबई

You cannot copy content of this page