पोलीस पाटलांच्या सतर्कतेने टळला दरोडा;ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून करून सदर यंत्रणेचा वापर करून गुन्हे प्रतिबंधासाठी सहकार्य करावे पोनि संजय ठेंगे
प्रतिनिधी(दि.२७ जुलै):-२६ जुलै 2023 रोजी रात्रीच्या गस्त दरम्यान खरातवाडी येथे चोर आल्याची माहिती मिळताच रात्रगस्तीवरील बेलवंडी पोलीस ठाण्याचे हेकॉ/शेख यांनी तात्काळ इतर जवळच्या गावांना ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती दिली.ही माहिती कळताच पिंपळगाव पिसा येथील पोलिस पाटील सुनील शीवनकर यांनी प्रतिसाद देत गावातील पोलिस मित्र योगेश डोईफोडे,सागर डोईफोडे,विजय वाजे,किरण सरोदे,सुहास सरोदे सह गस्त सुरू केली.गावात दुचाकिने चोर येताच चोरांनी पोलिस मित्रांना पाहून पळून जाऊ लागल्याने चोरांचा स्वतःचे चारचाकीने सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यांना ओव्हरटेक केले.त्यावेळी चोरट्यांचा तोल जाऊन मोटारसायकल बाजूच्या उसाचे शेतात पडल्याने चोरांनी मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेवून पलायन केले.त्यावेळी चोरांच्या सोबत असलेली हत्यारे,तसेच चोरांनी चोरून आणलेल्या कोंबड्या ही तेथेच सोडून पळून गेले.बेलवंडी पोलिसांनी तात्काळ श्वान पाचारण करून आरोपींचा शोध घेतला असता त्यांना आरोपींच्या पलयानाची निश्चित दिशा समजली. पुढील तपास पोलीस करत आहेत.या कारवाईत बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोउपनी/चाटे,पी.एन.कदम,पोलीस शिपाई/शिपणकर,विनोद पवार,संदीप दिवटे,सतीश शिंदे,संदीप शिंदे,संपत गुंड,रामदास भांडवलकर,महिला पोलीस सुरेखा वलवे यांनी सहभाग घेतला.या कामगीरी करिता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे,यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पाटील श्री.शिवणकर यांची भेट घेऊन त्यांचा व पोलीस मित्रांचा तसेच पोहेकॉ/शेख,पोहचा/शिंदे यांच्या समय सूचकतेचे कौतुक करून सन्मानित केले.तसेच इतरही पोलीस पाटलांनी या प्रकारे आपापल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून कार्यान्वित करून सदर यंत्रणेचा वापर करून गुन्हे प्रतिबंधासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.गावागावातील सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांनीही आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेचे थकीत बिल ग्रामनिधीतून भरून तात्काळ आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करून घ्यावी.तसेच लोकवर्गणीतून वा ग्रामनिधीतून गावागावात वाड्या वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.इतरही पोलीस अधिकारी कर्मचारी यांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या.