संगमनेर प्रतिनिधी/राजेंद्र मेढे (दि.१५ ऑगस्ट):-संगमनेर येथे येण्यास नकार दिलेल्या सहा वर्षे वयाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला तर चार वर्षाच्या मुलगीही या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.हिवरे बाजार ता.पारनेर येथील अंकुश अनिल बर्डे हे मनीषा विठ्ठल माळी व तिचा मुलगा विलास आणि मुलगी वैष्णवी हे कोल्हारहून लोणीमार्गे संगमनेरकडे निघाले होते. मात्र श्रेयस खर्डे यांच्या कोल्हार येथील वस्ती जवळ आल्यावर सहा वर्षाचा मुलगा विलास याने पुढे जाण्यास नकार दिला.त्यामुळे अंकुश याचा राग अनावर झाला. त्याने विलासला बेदम मारहाण केली.चार वर्षांच्या वैष्णवी हिला देखील त्याने मारहाण केली.यात विलासचा मृत्यू झाला तर वैष्णवी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मनीषा हिच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी अंकुश बर्डे याला अटक करून त्याच्या विरुद्ध 469/23 भादवि कलम 302, 323 नुसार गुन्हा दाखल केला.त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.
