ग्रामीण रुग्णालयातुन कॉपरचे पाईप चोरणाऱ्या टोळीस एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.२६ ऑगस्ट):-संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातुन कॉपरचे पाईप चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकीकत अशी की,फिर्यादी शकुंतला आसाराम पालवे (रा.घुलेवाडी ता.संगमनेर जि.अहमदनगर) यांचे मालकीचे ट्रॉमा केअर सेंटर घुलेवाडी,संगमनेर येथील सेट्रलाईज ऑक्सीजन पाईपलाईन व टर्मीनल हे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडुन नुकसान करुन एकुण १२,६१,०२९/-रुकिं.चा त्यात कॉपर पाईप,आऊटलेट टर्मीनल ओर असा मुद्देमाल चोरुन नेला होता.
या घटने बाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना पोनि/ दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर रा.संगमनेर याने त्याचे साथीदारांसह केला असुन तो त्याचे साथीदारांसह संगमनेर शहरातील केशव तिर्थ मंदीर गंगामाई घाट संगमनेर येथे येणार असल्याचे माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे पथकाने नमुद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता बातमीतील वर्णनाप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याचे दोन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर रा. आठरापगड जाती,वेल्हाळेरोड,संगमनेर ता.संगमनेर २) निखील उर्फ अजय विजय वाल्हेकर आठरापगड जाती,वेल्हाळे रोड,ता.संगमनेर ३) सागर बाळू गायकवाड रा. साठेनगर घुलेवाडी ता. संगमनेर असे असल्याचे
सांगितले.त्यांच्याकडे गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदार नामे ४)अक्षय सावन तामचोकर रा. भाटनगर,घुलेवाडी, ता.संगमनेर (फरार) ५) शुभम उर्फ पप्पु बाळु गायकवाड रा. साठेनगर, घुलेवाडी,
ता. संगमनेर (फरार ) ६) मयुर राखपसरे रा.म्हसोबानगर, घुलेवाडी, ता. संगमनेर ( फरार ) यांचे सोबत केला असुन गुन्हयातील चोरुन नेलेला मुद्देमाल ताब्याचे पाईप हे भंगार खरेदी विक्री करणारी महिला नामे शाहीन अब्दुल अली खान रा.इदगाह, मैदानाजवळ,संगमनेर व इसम नामे अफजल अहमद शेख रा. विजयनगर,कुरणरोड, संगमनेर यांना विक्री
केल्याचे सांगितले त्याप्रमाणे गुन्हयातील मुद्देमाल विकत घेणा-यांना ताब्यात घेऊन विचारपुस करुन एकुण ७,२५,६२५ /- किंचा त्यामध्ये आँक्सीजन लाईन साठी वापरले जाणारे कॉपरे पाईपचे २२ एमएम,१२एमएम,८ एमएम चे तुकडे एकुण १६० किलो वजनाचे व ६५० मिटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग श्री.सोमनाथ वाकचौरे,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/सचिन अडबल, पोना/रविंद्र कर्डीले,मपोना/ भाग्यश्री भिटे,पोना/फुरकान शेख,पोना/मेघराज कोल्हे,पोना/प्रशांत राठोड,पोना/ व्यवहारे,पोकॉ/आकाश काळे,पोकॉ/अमृत आढाव यांनी केली आहे.