
अहमदनगर (दि.९ सप्टेंबर):-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद,बातमीची हकिगत अशी की,
यातील फिर्यादी श्री.मुरलीधर गहिणीनाथ गोलेकर (रा.गोलेकर लवण,खर्डा,ता.जामखेड) हे घरात झोपलेले असताना अनोळखी चार इसमानी किचनचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन गजाने मारहाण व जखमी करुन 2,04,800/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख घरफोडी करुन चोरुन नेले होते.या घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन खर्डा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 165/2023 भादविक 459, 34 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक सराईत गुन्हेगारांना चेक करताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील प्रमाणे दाखल गुन्हा हा आरोपी नामे लाल्या ऊर्फ सोन्या भोसले रा.बेलगांव,ता. कर्जत याने त्याचे साथीदारासह केला असुन तो आंधळेवाडी,ता.आष्टी,जिल्हा बीड येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत मागदर्शन केल्याने पथकाने लागलीच आंधळेवाडी, ता. आष्टी, जिल्हा बीड येथे जावुन आरोपीचे वास्तव्या बाबत माहिती घेवुन खात्री करता संशयीत आरोपी मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीस पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) लाल्या ऊर्फ सोन्या ऊर्फ राजेंद्र ईश्वर भोसले रा. बेलगांव,ता.कर्जत असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे निकाजी काळे,कान्हा काळे व संतोष आंधळे यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
ताब्यातील आरोपीचे इतर साथीदाराचा शोध घेता आरोपी नामे 2)निकाजी अभिमान ऊर्फ जिन्या काळे रा.आष्टी,जिल्हा बीड व 3) संतोष पोपट आंधळे रा.आंधळेवाडी,ता.आष्टी, जिल्हा बीड हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले.आरोपी साथीदार नामे 4) कान्हा उध्दव काळे रा.ता.आष्टी, जिल्हा बीड (फरार) याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 1,50,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण व 50,000/- रुपये किंमतीची शाईन मोटार सायकल असा एकुण 2,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.यातील आरोपी नामे लाल्या ऊर्फ सोन्या ऊर्फ राजेंद्र ईश्वर भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर,बीड व नाशिक जिल्ह्यात दरोडा,खुनासह दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी,घरफोडी व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे निकाजी अभिमान काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द बीड,बुलढाणा व सातारा जिल्ह्यात दरोडा व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 3 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे,पोना/रविंद्र कर्डीले,गणेश भिंगारदे, संतोष लोढे,विजय ठोंबरे, फुरकान शेख,पोकॉ/अमोल कोतकर,किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे,मच्छिंद्र बर्डे,बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे,विजय धनेधर, चापोहेकॉ/अर्जुन बडे व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.