
अहमदनगर (दि.९ सप्टेंबर):-एमआयडीसी परीसरातून मोटारसायकलची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून ३,१०,०००/- रु किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी फिर्यादी नामे बाबासाहेब बापुराव तेलोरे (रा.व्यंकटेश अर्पाटमेंट नवनागापूर ता.जि अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की,दि.08 ऑगस्ट 2023 रोजी सकाळच्या सुमारास स्टेट बैंक ऑफ इंडीया नागापुर येथून त्यांचे मालकीची 100000 /- रु कि ची शाईन मोटारसायकल नंबर एमएच.16.योएक्स.7846 हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजि नंबर 804/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) किशोर जयसिंग पटारे रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर याने केला आहे.
त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी किशोर जयसिंग पटारे रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यास शिताफीने पकडले.त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच आरोपीकडे एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतून आणखी दोन शाईन मोटारसायकली व राहुरी पोस्टे हददीतुन १ विना नंबरची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत केली आहे व त्याने चोरल्याचे कबुल केले आहे.या बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजि नंबर १) ८०४/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे २) २५२ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोना/गणेश चौधरी,पोना/बंडु भागवत, पोना/राजु सुद्रीक,पोना/रजपुत,पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/भगवान वंजारी यांनी केली.