
संगमनेर (तालुका प्रतिनिधी राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील वडझरी,तळेगाव दिघे परिसरात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुपारी सदिच्छा भेट देत खरिपामध्ये जळून गेलेल्या सोयाबीन,मका पिकांची पाहणी केली.
आज जोरदार पाऊस सुरू असताना देखील उद्धव ठाकरे यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी ५ मिनिट संवाद साधला.दुष्काळ सदृश्य परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आर्थिक नुकसान भरपाई तसेच निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या.
याच वेळी पाऊस आला अन् शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला.पाउस आल्याने अनेक शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे यांच्याशी स्पष्टपणे संवाद साधता आला नाही.मात्र अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मनातील भावना यावेळी व्यक्त केल्या.