अहमदनगर (दि.८ सप्टेंबर):-सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यानी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. तद्नंतर भंडारा उधळला.मात्र या प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
पोलिसांसमक्ष झालेल्या या मारहाणीचा आम्ही निषेध करत असून,संबंधितांवर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे.याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल,याबाबतची प्रशासनाने नोंद घ्यावी.तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी-मेष महामंडळची प्रस्तावित जागा ढवळपुरी,ता.पारनेर येथून बदलून अन्यत्र नेण्याच्या हालचली प्रशासकीय पातळीवर सुरु आहेत.
याबाबत समाजात तीव्र असंतोष असून,समाजाचे नेते आ.प्रा.राम शिंदे,मा.आ. महादेव जानकर,आ.गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर केलेला विषय कोणाच्या सांगण्यावरुन बदलला जात आहे,याचाही खुलासा होण्याची गरज आहे.अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नामांतराच्या वेळी विरोध करणार्यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक असल्याने अशा घटना घडत आहेत,तरी धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या वेळी श्री.काका शेळके शिवसेना उपजिल्हाप्रमुख,श्री.सचिन डफळ मनसे जिल्हाध्यक्ष,श्री.राजेन्द्र तागड अध्यक्ष वधू वर मेळावा,श्री.निशांत दातीर अध्यक्ष धनगर समाज सेवा संघ,श्री.भगवान जऱ्हाड प्रदेश महासचिव राष्ट्रीय जनमंच,श्री.अशोक होंनमने जेष्ठ नेते,श्री.केदार हजारे,संग्राम शेळके,अथव गंगावणे,वैभव घायतडक,अशव औटी,कृषा तेपले,राहुल देठे इत्यादी उपस्थित होते.
