अहमदनगर (दि.८ सप्टेंबर):-पाईपलाईन रोड येथील रेणाविकर कॉलनी मध्ये एमएसईबीच्या पोलच्या तारा रस्त्यावरच पडलेल्या आज सकाळ पासून या तारांचे जॉईंट उघडे पडले असून या तारांपासून येथील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

यावेळी नागरिकांनी सांगितले की एमएसईबी कार्यालयांमध्ये वेळोवेळी कॉल केला असता अद्यापही कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली नाही.
त्यामुळे या उघड्या पडलेल्या तारांमुळे कोणाला इजा झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय.कॉलनीतील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकारी कॉल करून पण येत नाही त्यामुळे संतप्त होऊन अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
