अहमदनगर (दि.८ सप्टेंबर):-श्री.साई इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गावडे मळा येथे गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अशोक कानडे हे होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.अशोक गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष अशोक कानडे यांनी व इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून केली.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बालगोपाळांनी केलेला रॅम्प वॉक या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री.मुंडिलवार सर व सोनटक्के सर आणि सौ.मीना गायकवाड मॅडम यांनी केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या बाल विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाच्या वेशात रॅम्प वॉक, केला.संगीतमय स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांची दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पार पडली.त्यात इयत्ता दहावी इयत्ता नववी इयत्ता आठवी इयत्ता सातवी व इयत्ता पाचवीचे विद्यार्थी दहीहंडी फोडण्यात यशस्वी झाले.तर विद्यार्थ्यांनी दोन थर लावून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदी व उत्साही होते.आजच्या कार्यक्रमात श्रीमती.माधुरी जाधव यांनी जन्माष्टमीचे माहिती दिली. श्रीमती.अस्मिता घोरपडे आणि श्रीमती प्रिया मल्होत्रा यांनी सूत्रसंचालन केले. फलक लेखन श्री.पुनम पानसरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एज्युकेशन डायरेक्टर श्री.डॉ.अर्जुन राठोड सर,प्राचार्य श्रीमती तनुजा लोंढे मॅडम,उपप्राचार्य श्री.प्रसाद पाटोळे,तंत्र साहाय्यक म्हणून राजू दहिफोडे यांनी प्रमुख भूमिका निभावली.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
