
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर):-चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपींकडुन 10 तोळे सोने जप्त करून 2 कुख्यात गुन्हेगार पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,घटनेतील फिर्यादी सौ. प्रिया मुंकूद झंवर (रा. छायानगर,रेल्वे स्टेशन, अहमदनगर) या त्यांच्या मुलासोबत मोटार सायकलवर जाताना अनोळखी दोन इसम मोटार सायलवर फिर्यादीचे जवळ येवुन गळ्यातील मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेले होते.या घटने बाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 855/2023 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला पोलीस यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन ना उघड चैन स्नॅचिंग गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक सराईत गुन्हेगारांना चेक करत असताना दि.10 सप्टेंबर 2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, चैन स्नॅचिंग चोरी करणारे लहु काळे व विनोद पिंपळे दोन्ही रा.नाशिक असे दोघे नगर मनमाड रोडने अहमदनगरच्या दिशेने काळे रंगाचे विना नंबर पल्सर मोटार सायकलवर चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन,पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केल्याने पथकाने लागलीच नगर मनमाड रोडने जावुन कॉटेज कॉर्नर जवळील सिना नदी वरील पु ललाच्या जवळ सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात दोन इसम काळे रंगाच्या पल्सर मोटार सायकलवर येताना पथकास दिसले पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल थांबवली.पल्सर वरील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) लहु बबन ऊर्फ बबलु काळे रा.संत जनार्धन साखर कारखान्या मागे,पळसे, जिल्हा नाशिक व 2)विनोद गोविंद पिंपळे रा.गोसावीवाडी,विजय स्विट्स जवळ,नाशिक रोड, जिल्हा नाशिक असे असल्याचे सांगितले.त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळुन आले. दागिन्याबाबत विचारपुस करता त्यांनी चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलो असल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे 3)सुनिल पवार (फरार) नाशिक यांचे सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणखीन कोठे कोठे गुन्हे केले या बाबत विचारपुस करता त्यांनी अहमदनगर, संगमनेर,श्रीरामपूर,राहुरी, नाशिक व नवी मुंबई परिसरात जबरी चोरी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जात 4,75,000/- रुपये किंमतीचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने व 1,00,000/- रुपये किंमतीची काळे रंगाची विना नंबर मोटार सायकल असा एकुण 5,75,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.यातील आरोपी नामे लहु बबन ऊर्फ बबलु काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात जबरी चोरी व दुखापत असे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी नामे विनोद गोविंद पिंपळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पुणे जिल्ह्यात जबरी चोरी एकुण -6 गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/ तुषार धाकराव,पोहेकॉ/विजय वेठेकर,दत्तात्रय हिंगडे,अतुल लोटके,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,गणेश भिंगारदे, भिमराज खर्से,पोकॉ/सागर ससाणे,अमृत आढाव, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.