
अहमदनगर (दि.१२ सप्टेंबर):-दि.११ सप्टेंबर रोजी अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अहमदनगर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सय्यद अफजलभाई यांनी यावेळी प्रस्ताविक केले.सकल मुस्लिम समाजास मुस्लिम सरंक्षण कायदा बनवणे या करिता हे धरणे आंदोलन करण्यात आले राज्यात विशेषत: अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजा विरूद्ध सामाजिक द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करून भडकावू भाषणे करुन जातीय तेढ निर्माण केले जात आहे तसेच धार्मिक स्थळे, दर्गाह यांची तोडफोड करुन धार्मिक ग्रथांची विटबंना केली जात आहे.त्यातच प्रशासन मुस्लिम समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून एकतर्फी कारवाई केली जात आहे, या कारणाने संविधान व न्यायालयाचा अवमान केला जात आहे हे त्वरित रोखण्यात यावे व मुस्लिम सरंक्षण कायदा लागू करावा.
या करिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख,प्रवक्ते डॉ. जालिंदर घिगे,शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,अनिल पाडळे,नगरसेवक भाशेठ कुरैशी,महेश साळवे,कुमार भिंगारे,प्रसाद भिवसने, ॲड.योगेश गुंजाळ व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.