
अहमदनगर (दि.१२ सप्टेंबर):-बीएसएनएल कार्यालयाचे लोखंडी पाईपची चोरी करणाऱ्या तीन जणांना चोवीस तासाच्या आत पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.
बातमीतील हकीकत आशिकी,दि.११ सप्टेंबर रोजी श्री.सोमनाथ रानबा जगताप, उपमंडल अभियंता बीएसएनएल यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कि,एक्सर्टनल विभागातील नगर सोलापुर रोड वरील मुठ्ठी चौकाजवळील पुलाच्या ओढयामध्ये २० फुट लांबी व ६ इंच रुंदीचा जि.आय. लोखंडी पाईप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे.या फिर्यादी वरून भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 590/2023 भादविक 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा दाखल झाल्या नंतर आरोपी हे अनोळखी होते.
अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि/ डी.एस.मुंडे यांनी स्वतंत्ररित्या पोलिसांचे एक पथक तयार करुन पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन गोपनीय बातमीदार तयार करुन तपास केला असता आरोपी नामे 1) रोहीत अशोक गायकवाड 2) अनिकेत सुनिल पारधे 3) तेजस मायकल जाधव सर्व रा. सातखोल्या,नगर कॉलेज शेजारी,पावर हाऊस जवळ, अहमदनगर हे बीएसएनएल चे पाईप व्हेक्स ब्लेडने कापुन चो-या करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींचा पथकातील अंमलदार यांनी तात्काळ शोध घेवून स्टेशनरोड परीसरात आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना आरोपींना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेले जि.आय.लोखंडी पाईप काढुन दिल्याने ते जप्त केले आहेत.हा गुन्हा दाखल झाल्या पासुन अवघ्या २४ तासात आरोपींचा शोध घेवून आरोपींकडुन गुन्हयातील गेलेला मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सफौ/के.बी.सोनार,पोहेकॉ/संदीप घोडके,पोहेकॉ/रेवननाथ दहिफळे पोना/दिपक शिंदे,पोकॉ/ अमोल आव्हाड,पोना/सचिन गोलवड यांनी केली आहे.