
संगमनेर दि.१२ सप्टेंबर/(राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील आरोपी नामे अश्फाक हमीद मनियार रा.मनियार वस्ती याने अल्पवयीन मुलीस तळेगाव दिघे ता.संगमनेर येथून फुस लाऊन पळून गेले होते.
याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुरन ४१८/२०२१ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्ह्याचा तपास न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांच्याकडे तपासाकामे वर्ग करण्यात आला होता व या गुन्हाचा तपास पोसई/प्रियांका आठरे या करीत होत्या.या गुन्ह्याचा तपास वर्ग झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हरीश खेडकर व शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपी नामे अश्फाक हमीद मनियार याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता हा आरोपी समर्थ नगर सिन्नर जिल्हा नाशिक येथे राहत असल्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमूद बातमीच्या ठिकाणी जाऊन आरोपीचा त्या पट्ट्यावर शोध घेतला असता आरोपी हा अपहरित मुलगी व तिचे लहान आठ महिन्याचे बाळ यांच्यासह राहत होता त्याला व अपहरण मुलगी व लहान बाळाला तात्काळ ताब्यात घेऊन संगमनेर येथे आले व सदर गुन्ह्याचे मूळ कागदपत्र आरोपी अपहरित मुलगी व तिचे सोबत लहान बाळ असे पुढील तपास कामी संगमनेर तालुका पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश खेडकर पोसई/बाळासाहेब शिंदे, मपोसई/प्रियांका आठरे,पोहेकॉ/समीर सय्यद, मपोहेकॉ/अनिता पवार,मपोकॉ/छाया रांधवन, चापोकॉ/काळे व पोना/फुरकान शेख ने.सायबर सेल यांनी केली आहे.