
अहमदनगर (दि.१३ सप्टेंबर):-नगर शहरातील कायनेटिक चौकात मराठा क्रांती मोर्चा,मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार दि.१३ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ओबीसी कोट्यातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सैराट या गावांमध्ये उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत हा रस्ता रोको करण्यात आला.या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा तरुणांनी सहभाग घेतला एक मराठा ‘लाख मराठा आरक्षण’ ‘आमच्या हक्काचं’ नाही कुणाच्या एकाच अशा घोषणा देत तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला.यावेळी समाजातील अनेक राजकीय मंडळींनी रस्ता रोको आंदोलनासाठी हजेरी लावली होती.