
अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती.
या चोरीतील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे.बातमीची हकीकत अशी की,शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात तुषार विजय वैद्य हे पुजारी आहेत.त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या नुसार गुरन 809/23 भादवीक 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी मंदिरात प्रवेश करत मूर्तीवरील 16 लाख 76 हजार 400 रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले.मंदिर चोरीची घटना संवेदनशील असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले होते.
नमूद दिलेल्या आदेशा नुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथके नेमून तपास सुरु केला.पोलीस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमी मिळाली की,गणपत केदार (रा.हातराळ सैदापुर, ता.पाथर्डी) याने गणपत केदार,अजय छबू चव्हाण,जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव साथीदारांसह चोरी केलेले मंदीरातील सोन्या चांदीचे दागिने शेतात पुरुन ठेवलेले आहे.पोलिसांनी कारवाई करून आरोपीस ताब्यात घेत शेतात आणून पूरून ठेवलेले आभूषणे ताब्यात घेतली व आरोपींकडून ७ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/तुषार धाकराव, पोसई/सोपान गोरे,सफौ/ भाऊसाहेब काळे,बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे,सुरेश माळी, अतुल लोटके,पोना/रविंद्र कर्डीले,संदीप दरंदले,संतोष लोढे,सचिन अडबल,विजय ठोंबरे,भिमराज खर्से,संदीप चव्हाण,संतोष खैरे,गणेश भिंगारदे,पोकॉ/मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे,रणजित जाधव,रोहित मिसाळ,अमृत आढाव,बाळासाहेब गुंजाळ, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, उमाकांत गावडे,भरत बुधवंत व अरुण मोरे यांनी केली आहे.