८० वर्षांची परंपरा राखत चार पिढ्यांपासून गुरव परिवार करतात गौरींची प्रतिष्ठापणा..!!
संगमनेर दि.२३ सप्टें (दत्तात्रय घोलप):-बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते.म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येत असते असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या,फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं.ज्येष्ठा व कनिष्ठ गौरी आवाहन हा हिंदू धर्मातील दिवाळी सणाप्रमाणेच विशेषतःमहाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण मानला जातो.विवाहित स्त्रिया आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात आणि गौरी देवीची प्रार्थना करतात.गौरींच्या स्वागताचा हा आनंददायी सण कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
गौरी गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य भांडे,धान्यांच्या रास गौरीच्या समोर मांडल्या जातात.गौरीला पुरणपोळीचे नैवेद्य तसेच चहा व इतरही सर्व वस्तू ठेवल्या जातात.३ दिवस गौरींचे विधिवत पूजन केले जाते.त्यामुळे घरात एक मांगल्याचे वातावरण निर्माण होते.दररोज नित्यनियमाने आरती पूजाआर्चा पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील व्यावसायिकदृष्ट्या रहिवासी असणारे तसे मुळतःहा चिंचोली गुरव भूमिपुत्र बाळासाहेब उर्फ ओमप्रकाश गुरव कुटुंबियांच्या वतीने वाजात-गाजत अतिशय उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने ४ पिढ्यांपासून हा गौरी,महालक्ष्मी गणपतीचा उत्सव अतिशय मनोभावे उत्साहात साजरा केला जातो.आजही ती परंपरा या गुरव परिवारांने जपली आहे.
गौरी गणपती पुजनाचा सण हा गुरव परिवारामध्ये त्यांचे आजोबा,पंजोबा व त्या अगोदरची ही पिढी व वडिलांनिही हा सण अतिशय उत्साही वातावरण संपन्न केला आहे.त्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या ४ पिढ्यांपासून मनोभावाने व मंगलमय वातावरणात गौरीचे स्वागत व पूजन करण्याची अखंड परंपरा आहे.गौरी गणपतीच्या प्रतिष्ठापणे विषयी गुरव परिवारातील महिलाभगीनी व बाळासाहेब गुरव यांनी बोलताना अधिक माहिती विशद केली.