Maharashtra247

व्यापा-याला भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या इसमास कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर (दि.१ ऑक्टोबर):-शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत व्यापा-याला भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या इसमास पकडण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.

बातमीची हकीकत अशी की,दि.३० सप्टेंबर रोजी घटनेतील फिर्यादी सुमित किरण सोनग्रा (धंदा-व्यापार, रा.विराज कॉलनी डीएसपीचौक,अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली की,दि.मी ३० सप्टेंबर रोजी माझ्या मालकीच्या शु मॅक्स नावाच्या चप्पल व बुटाच्या दुकानात असताना इम्रान अल्ताब खान उर्फ बाबला हा तेथे नविन बुट घेण्यासाठी आला व बुटाच्या किंमतीवरुन माझ्याशी वादविवाद करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देवून पळुन गेला.

दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे प.नॉ.कॉ. रजि. नं. १११३ / २०२३ भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.सदर तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखुन पोनि/ चंद्रशेखर यादव यांनी तपासाचे चक्रे तात्काळ फिरवून गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना त्याचा शोध घेणेकामी कोठला परिसरात पाठविले.

गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ कोठला परीसरात जावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले.पुढील कार्यवाही मपोसई/शितल मुगडे या करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, मपोसई/शितल मुगडे,पोना/ योगेश भिंगारदिवे,पोकॉ/ अभय कदम,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/तेहसिन शेख, पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/ अतुल काजळे,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page