संगमनेर येथे जागतिक रेबीज दिनानिमित्ताने प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर संपन्न .!!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ संगमनेर येथे जागतिक रेबीज दिन निमित्ताने दि.30 सप्टेंबर 2023 रोजी श्वान आणि मांजरांना मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरात संगमनेर शहर व आसपासच्या गावातील पाळीव प्राण्यांच्या मालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.यामध्ये संगमनेर शहर,संगमनेर खुर्द,सुकेवाडी, गुंजाळवाडी,घुलेवाडी,वैदुवाडी,समनापुर या गावातील पशुपालक आपल्या पाळीव प्राण्यांना पशुवैद्यकीय दवाखाना संगमनेर येथे येऊन लसीकरण करून घेतले.या शिबिरात दहा विविध जातीच्या 71 श्वानांना तसेच पर्शियन आणि स्थानिक जातीच्या 42 मांजरांना अशा एकूण 113 पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
अशी माहिती पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ संगमनेर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नितीन जोंधळे यांनी दिली. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार असून उष्ण रक्ताच्या सर्व प्राण्यांमध्ये हा आजार आढळून येतो तसेच मांजर वर्गीय जनावरांमध्ये आणि जंगली. प्राणी या आजाराची लक्षणे नसतानाही विषाणू वहन करण्याचे काम करतात व त्यांची प्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर ह्या आजाराने बाधित होतात. रेबीज वर कुठलाही इलाज नसल्याने हा आजार अतिशय गंभीर स्वरूपाचा मानला जातो. यामुळे ह्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी, रोगप्रतिबंधात्मक लसीकरण हाच एक उपाय असल्याचे डॉ. जोंधळे यांनी सांगितले.
तसेच पशुपालकांनी उत्साहाने शिबिरात भाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठीयासाठी लायन्स क्लब ऑफ सफायर संगमनेर चे अध्यक्ष अतुल जी अभंग. साक्षी वेटरनरी लॅब चे संचालक डॉ अमेय पाध्ये, हेल्पिंग हॅण्डस युथ ऑर्गनायझेशन चे संस्थापक श्री भूषण नरवडे. तसेच जाणता राजा प्रतिष्ठान प्राणी मित्र संघटना संगमनेर चे मुकेश नरवडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी खाजगी पशु सेवा देणारे डॉ.सागर गांडूळे, डॉ.विशाल भगत, डॉ.आकाश पानसरे तसेच पशुसंवर्धन विभागातील परिचर श्री ढेंबरे, कैलास कांबळे आदींचे सहकार्य लाभले.