Maharashtra247

साकुर येथील आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी 

संगमनेर/दत्तात्रय घोलप:-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात साकुर येथे 2 ऑक्टोबर 2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक मुख्याध्यापक,सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसर तसेच ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या मदतीने साकुर गावचा परिसर स्वच्छ केला.तदनंतर शाळेच्या प्रांगणात जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. शिवराज कदम सर, मुख्याध्यापक श्री.सुनील खेडकर सर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.श्री.गोसावी सर,श्री. महारनवर सर,श्रीमती.कदम मॅडम,श्रीमती.तांबे मॅडम यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधीजी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचे पुनर्जीवन केले.तसेच मुख्याध्यापक श्री.शिवराज कदम सर यांनी प्रभावी वक्तृत्व शैलीत गांधीजींनी देशासाठी केलेले योगदान विविध चळवळी मोजक्या शब्दात विद्यार्थ्यांच्या समोर मांडल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.प्रियांका जठार मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रीमती. अश्विनी गोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्राथमिक मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page