Maharashtra247

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या लॉंग मार्चला आमदार निलेश लंके यांची भेट;महापालिका सफाई कामगार ग्राउंड लेव्हल ला काम करणारा वर्ग

अहमदनगर (दि.३ ऑक्टोबर):-अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग, लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क नोकरी लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी नगर मधून मुंबईकडे पायी कूच केली असून अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी हे मुंबईकडे निघाले आहे.

जखणगाव या ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांची नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली.व आ.निलेश लंके म्हणाले की,सफाई कामगाराला सरकारने जर चांगला पगार दिला तर ते आनंदाने अतिशय जोमाने आपले काम पार पाडतील.निश्चितच काय अडचण आहे हे मी समजू शकतो मी एक ग्रामपंचायत सदस्य ते आमदार झालेलो आहे त्यामुळे कामगारांच्या सर्व व्यथा मला माहिती आहे.

दिवाळी आली की सफाई कामगार गल्लो गल्ली दिवाळीतही सणासुदीच्या दिवशी साफसफाई करताना दिसतात.हा साफसफाई करणारा जो वर्ग आहे तो ग्राउंड लेव्हलला काम करणारा वर्ग आहे.यावेळी ते कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे,वायकर व महापालिका कर्मचाऱ्यांशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्र्यांशी ही याविषयी चर्चा करतो व सकारात्मक मार्ग यातून काढू.यावेळी आमदार निलेश लंके यांच्या वतीने लॉंग मार्चला चाललेल्या सर्व महापालिका कर्मचाऱ्यांना संध्याकाळी भोजनाची व्यवस्था केली.

You cannot copy content of this page