
अहमदनगर (दि.७ ऑक्टोबर):-राहाता तालुक्यातील साकुरी गावातील श्री.साई इनपुट शेती औजाराच्या दुकाना समोरुन शेतीसाठी वापरात येणारे औजारे चोरणारे चार आरोपी चोवीस तासात जेरबंद करण्यात राहता पोलिसांना यश आले आहे.
राहता गावातील साकुरी गावातील सावता मंदीराचे पाठीमागे नगर-मनमाड रोडलगत असणारे श्री.साई इनपुट नावाचे शेती मशिनरी दुकाना समोरील भुर कंपनिचे थ्रेशर (मळणी यंत्र) हे ट्रॅक्टरला जोडुन थ्रेशर मशिन चोरुन नेले बाबत दुकान मालक श्री.विशाल देविदास वाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस स्टेशन येथे गुरनं 508/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे तपासामध्ये वरीष्ठांचे आदेशाने पथक तयार करण्यात आले होते. सदर तपासमध्ये घटस्थळाची बारकाईने पाहणी करुन गेलेला माल याचे वर्णन तसेच इतर परीस्थीजन्य पुराव्याचे आधारे तांत्रिक विश्लेषण करुन व गोपनिय बातमिदाराच्या माहीतीच्या आधारे गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली असुन या आरोपींना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांचे कडुन चोरीस गेलेले भुर कंपनिचे थ्रेशर (मळणी यंत्र),तसेच चोरी करताना वापरण्यात आलेला सामे कंपनिचा ट्रॅक्टर,पॅगो कंपनिची मालवाहतुक रिक्षा, होंडा कंपनिची युनिकॉर्न मोटार सायकल,हिरोहोंडा कंपनिची पँसन प्रो मोटार सायकल असा एकुण 10,70,000/-रु.मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर विभाग स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली रहाता सहा.पोलिस निरीक्षक श्री.कैलास वाघ,पोसई/ अरविंद गुंजाळ,सफो/बाबासाहेब सांगळे,पोहेकाँ/प्रभाकर शिरसाठ,पोहेकाँ/सुधाकर काळोखे,पोहेकाँ/अशोक झिने,पोहेकाँ/ रामेश्वर इंगळे,चापोहेकाँ/नवनाथ अनारसे,पोना/कल्याण काळे, पोना/गणेश गडाख,पोकाँ/ अमोल नागले,पोकाँ/ विलास मोरे यांनी केलेली आहे.