
अहमदनगर (दि.७ ऑक्टोबर):-घरगुती गॅस टाकीतील गॅस अवैधरित्या एलपीजी वाहनात भरणारा आरोपी 67,000/- रु. किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद,बातमीतील हकीकत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदाराचे पथक नेमुन अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन तात्काळ रवाना केले.पथक अहमदनगर शहरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सचिन शिंदे, रा. वैदुवाडी,अहमदनगर हा धोकादायक पध्दतीने घरगुती गॅस टाक्या या एलपीजी वाहनामध्ये अनधिकृतपणे गॅस भरण्याचे उद्देशाने स्वत:चे कब्जात बाळगुन आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता एक इसम बसलेला व त्याचे बाजुस लाल रंगाच्या गॅस टाक्या दिसुन आल्या पथकाची खात्री होताच पथकाने अचानक छापा टाकुन सदर इसमास ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सचिन प्रकाश शिंदे हल्ली रा. वैदुवाडी,सावेडी,अहमदनगर मुळ रा.श्रमिक नगर,पंचक जेलरोड,नाशिक रोड,जिल्हा नाशिक असे असल्याचे सांगितले.
सदर इसमाकडे घरगुती गॅस टाक्या वापरा बाबत व गॅस भरणे बाबत परवाना आहे का? अशी विचारणा करता सदर इसमाने अधिकृत परवाना नसले बाबत माहिती दिल्याने आरोपीचे कब्जातुन 8 भारत गॅस कंपनीच्या टाक्या,गॅस रिफीलींग मशिन व गॅस नोझल असा एकुण 67,000/- रु.किंचा मुद्देमाल ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.2023 भादविक 285,286,336 सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/बाळासाहेब मुळीक,पोना/सचिन आडबल,संतोष खैरे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ रणजीत जाधव यांनी केलेली आहे.