
अहमदनगर (दि.१८ ऑक्टोबर):-मारुती व्हॅनसह शितपेय चोरणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह बारा तासाच्या आत जेरबंद करण्यात यश आले आहे.
बातमीची हकीकत अशी की,तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं – 1519/2023 भा.दि.व कलम 379 प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की,त्यांची मारुती व्हॅन नंबर एम एच 16 ए टी 1713 हीमध्ये शितपेय भरुन ते हॉटेलमध्ये पोहच करत असताना अज्ञात चोरटयाने गाडी मालासह पळवुन नेली आहे.
वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला प्राप्त माहीतीच्या आधारे पोलीसांनी यातील आरोपी नामे चंद्रकांत नानाभाऊ आजबे (रा.आदर्शनगर एमआयडीसी) याचा शोध घेवुन 75,000/- रु किंमतीचे मारुती व्हॅन व शितपेय हस्तगत केली आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि.श्री मधुकर साळवे,पो.उपनिरीक्षक/सचिन रणशेवरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे, अविनाश वाकचौरे,पोना/ वसीम पठाण,पोना/अहमद इनामदार,पोकॉ/सचिन जगताप,पोकॉ/सतिष त्रिभुवन संदिप गि-हे,पोकॉ/ बाळासाहेब भापसे,पोकॉ/ शिरीष तरटे,दत्तात्रय कोतकर, पोकॉ/सतीश भवर,गौतम सातपुते,अहमदनगर दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ.नितीन शिंदे,पोकॉ/राहुल गुंडू यांनी केली असुन पुढील तपास पोहेकॉ अनिल गिरीगोसावी हे करत आहेत.