
अहमदनगर (दि.१८ ऑक्टोबर):-गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला कोतवाली पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सहा हजार २०० रुपये किमतीचा ३६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून कोतवाली पोलिस ठाण्यात अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क) सह २०(ब)(२)(क),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद मुजाहीद शेख (वय ३३ वर्ष, रा.बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
शनिचौक ते सबजेल रोडवर एका झाडाखाली पत्र्याच्या शेडच्या आडोशाला एक इसम गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मंगळवारी (दि.१७) गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरक्षक यादव यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. जबजेल रस्त्यावर सापळा लावून कोतवाली पोलिस थांबलेले असताना एक इसम पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी लगेच संशयीत आरोपीला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत गांजा आढळून आला. ६२ पुड्यामध्ये एकुण ३६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोनि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुखदेव दुर्गे अधीक तपास करीत आहेत.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई सुखदेव दुर्गे, पोसई प्रविण पाटील, पोहेकॉ तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे,गोरख काळे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, याकुब सय्यद, राहुल गुंडु, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.