
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खळबळ जनक घटना घडली असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये संगमनेर येथील जिल्हापरिषद शाळेत तपासणीसाठी आलेल्या जिल्हा न्यायाधीश आणि अधिकारी यांच्या पथकाला शाळेच्या आवारात जुगारी पत्ते खेळताना दिसून आले.
सोमवारी (दि.१६ ऑक्टोबर) रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरानजीक असलेल्या घुलेवाडी गावातील जिल्हापरिषद शाळेच्या आवारातच पत्त्यांचा जुगार सुरू होता,जुगार खेळणाच्या तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल दिलीप तामचीकर (वय २१), शुभम मच्छिंद्र तामचीकर आणि शिया माचरेकर ( तिघेही रा. घुलेवाडी ता.संगमनेर) अशी गुन्हा झालेल्या तिघांची नावे आहेत.त्यांच्या विरुद्ध पोलिस प्रवीण देविदास डावरे यांनी फिर्याद दिली.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये न्यायालय वर्ग १३ जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे,संगमनेर पंचायत दाखल समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड हे घुलेवाडी येथील जिल्हापरिषद शाळेत पाहणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी तिघेजण शाळेच्या आवारात त्यांचा जुगार खेळ खेळत असल्याचे पथकातील न्यायाधीश घुमरे आणि इतरही अधिकाऱ्यांनी पाहिले.पोहेकॉ/प्रवीण डायरे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल करे हे तेथे गेले.यावेळी शुभम तामचीकर आणि शिवा माचरेकर हे दोघे जुगाराचे साधन,पैसे घेऊन पळून गेले. अनिल तामचीकर याला पोलिसांनी पकडले.पुढील तपास मपोना/संगीता डुंबरे करीत आहेत.