६७ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया व अहमदनगर शहारातील धम्म बांधवांच्या वतिने २४ ऑक्टोबर रोजी शहरात धम्म रॅलीचे आयोजन
अहमदनगर (दि.२१ ऑक्टोबर):-६७ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिना निमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया व अहमदनगर शहरातील धम्मबांधव यांच्या वतिने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीला म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेऊन लाखो अनुयायांनाही २२ प्रतिज्ञा देऊन दिक्षा दिली.ह्या घटनेला ६७ वर्ष पूर्ण होत आहेत.म्हणून धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी अहमदनगर शहरातील सर्व उपासक उपासिका यांनी मंगळवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सिध्दार्थबाग येथे बुध्द विहारात अभिवादन व दिक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या मध्ये सहभाग नोंदवावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.