संबळ वाद्यशिवाय नवरात्र पूर्ण होत नाही;संबळ वाद्य वाजविणारे कलाकार कमी होत चालले-भाऊसाहेब घावट
अहमदनगर (दि.२१ ऑक्टोबर):-सध्याच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या जमान्यात सर्व जण आकर्षीत झाले आहे,आपण आपली संस्कृती हि व्हिडीओ मध्ये पहातो.
असेच एक वाद्य म्हणजे संबळ ज्याशिवाय नवरात्र पूर्ण होत नाही पूर्वी पासून प्राचीन काळापासून संबळ वाजविणाऱ्या लोकांना आरतीसाठी रोज बोलवले जात होते पण आता हे वाजविणारे कमी होत चालले आहे अशी माहिती प्रसिद्ध संबळ वादक भाऊसाहेब घावट यांनी दिली.
नगर पासून ते पलंगाबरोबर तुळजापूर पर्यंत वादन करत जातात ते म्हणाले हि एक कला आहे व अवघड आहे, नवीन पिढी हि शिकत नाही किंवा याचे कोठे क्लासेस नाहीत पाहून व सरावातून हि कला मी शिकलो,माझ्या घरी देवीचे मंदिर आहे तिथे लहानपणापासून मी पाहत पाहत शिकलो व आज हि सेवा म्हणून पलंगापुढे वाजवतो वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितपटल या प्रकारात येणारे हे वाद्य आहे.गोंधळ मध्ये संबळ हे मुख्य बलस्थान आहे,कारण जेंव्हा संबळ वादक संबळ वाजवून आजूबाजूचा परिसर नाट्यमय,भक्तिमय करतो तेंव्हा सादरीकरणाला सुरुवात होते.