
अहमदनगर (दि.२४ ऑक्टोबर):-घरगुती भांडणाच्या कारणावरुन पत्नीला मारहाण करुन जीवे ठार मारणाऱ्या आरोपी पतीला कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर सुरेश चौधरी (राहणार, इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
मयत महिलेच्या नातेवाईक ऊषा निलेश राठोड (वय ४५ वर्षे धंदा-मजुरी रा. वॉर्ड नं २, सुरादवी, आंबराई झोडपडपट्टी, ता.कामठी जि.नागपुर) यांनी दिलेल्या फॅिर्यादीवरुन आरोपी ज्ञानेश्वर सुरेश चौधरी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.शिवानी राजकुमार तिवारी (वय- २५ वर्षे) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी ज्ञानेश्वर चौधरी याचे पत्नीसोबत दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ०७.०० वा. चे सुमारास वाद झाले. आरोपीने घरगुती कारणावरुन दारूचे नशेत पत्नीला कशानेतरी जबर मारहाण केली. पत्नीला अधिक मार लागल्याने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे भरती केले होते. शिवानी चौधरी यांच्यावर उपचार सुरु असताना अधिक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला.
मयत शिवानी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फॅिर्यादीनुसार आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पाेलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक/प्रवीण पाटील,याकूब सय्यद,योगेश भिंगारदिवे रियाझ इनामदार, सुजय हिवाळे,संदीप थोरात,सोमनाथ राऊत,अमोल गा, देवेंद्र पांधरकर यांनी ही कारवाई केली.