
अहमदनगर (दि.२९ ऑक्टोबर):-मराठा आरक्षणाचा तिढा राज्य शासनाकडून अजून सुटता सुटेनासा झालं आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज खूपच आक्रमक झाला असून आरक्षण हे आपल्या हक्काचे असून ते भेटलेच पाहिजे या भूमिकेवर मराठा समाज ठाम आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात गावा गावात वेशीवर आमदार खासदार व पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली आहे.अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यातील निंबळक व इसळक येथील ग्रामस्थ मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झाले असून सर्वपक्षीय नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे.तसेच सकल मराठा समाज व निंबळक व इसळक ग्रामस्थ यांच्या वतीने सोमवार दि.३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्र्नी सायंकाळी ८ वा.दरम्यान भव्य असे कॅन्डल मार्चचे आयोजन केले आहे.