
अहमदनगर (दि.२९ ऑक्टोबर):-अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर व स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार हे जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,हॉटेल कुरेशीचे पाठीमागे असलेल्या बंदीस्त रुममध्ये वेगवेगळे तीन डाव गोलाकार करुन काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता काही इसम दोन खोलीत गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेवुन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला व तेथे बसलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख एकूण २४ जणांना ताब्यात घेऊन ताब्यातील इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 7,36,640/- रुपये किंमतीची रोख रक्कम,एक स्कॉर्पिओ गाडी,विविध प्रकारचे 19 मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे मजुकाक 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री. अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, पोना/विजय ठोंबरे,ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे,सचिन आडबल,संदीप चव्हाण,रविंद्र घुंगासे,रणजीत जाधव,रोहित मिसाळ,जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ,मच्छिंद्र बर्डे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.