
अहमदनगर (दि.२८ ऑक्टोबर):-नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे मयत प्रविण डहाळे यांच्या खुन प्रकरणातील ५ सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री. प्रमोद संभाजी कापसे रा. सुरेगांव,ता.नेवासा यांचा मित्र प्रविण सुधाकर डहाळे रा. गळनिंब,ता.नेवासा याचे शेखर सतरकर व अशोक सतरकर यांच्या सोबत मागिल भांडणाचे कारणावरुन फोनवर वाद झाले होते.त्या कारणावरुन आरोपींनी तलवार,कोयता,लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने प्रविण डहाळे यास मारहाण व जबर जखमी करून जिवे ठार केले बाबत फिर्यादी यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. १०२८/२०२३ भादविक ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी पोनि / श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपांची माहिती घेवुन ताब्यात घेणेबाबत आवश्यक सुचना देवून पथकास रवाना केले.पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीची माहिती घेत असताना पोनि श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी नामे खंडु सतरकर व ईश्वर पठारे हे दोघे वरखेड, ता.नेवासा येथे असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवून खात्री करून कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने नेवासा पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोसई/संदीप ढाकणे,पोना/सुमित करंजकर,पोकॉ/तांबे यांना मदतीस घेवून वरखेड,ता. नेवासा येथे जावून आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अशोक ऊर्फ खंडू किसन सतरकर रा. गेवराई,ता.नेवासा व २) ईश्वर नामदेव पठारे वरखेड,ता.नेवासा असे असल्याचे सांगितले.त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचे इतर साथीदारांबाबत विचारपुस करता त्यांनी आरोपी नामे शेखर सतरकर, अरुण गणगे व बंडु साळवे हे तिसगांव,ता.पाथर्डी येथे असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही आरोपीना नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले व पथकाने लागलीच तिसगांव,ता.पाथर्डी येथे जावुन आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती घेवुन आरोपी नामे ३) शेखर अशोक सतरकर रा.गेवराई, ता.नेवासा, ४) अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे रा. सुरेगांव,ता.नेवासा व ५ ) बंडु भिमराव साळवे रा.बाबुर्डी बेंद,ता.नगर यांना ताब्यात घेवून पुढील तपास कामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे,राजेंद्र वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना / रविंद्र कर्डीले,ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले,विशाल दळवी. फुरकान शेख,पोकॉ बाळासाहेब गुंजाळ,रणजीत जाधव व चापोकॉ अरुण मोरे यांनी केली आहे.