पाईपलाईन रोड येथील वाणीनगर मध्ये सालाबाद प्रमाणे श्री.मोहटादेवी व श्री.महाकाली देवस्थानतर्फे महाप्रसादाचे आयोजन
अहमदनगर (दि.२८ ऑक्टोबर):-शारदीय नवरात्र उत्सवा निम्मित पाईपलाईन रोड येथील वाणीनगर येथे सालाबाद प्रमाणे श्री. मोहटादेवी व श्री.महाकाली देवी देवस्थानतर्फे नवरात्राच्या नऊ दिवस सलग विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
त्याच प्रमाणे दरवर्षीप्रमाणे येथे महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.यावर्षी ही रविवारी दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा.महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.