
पाथर्डी (दि.२८ ऑक्टोबर):-अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगावचे उपसरपंच रावसाहेब म्हातारदेव लोहकरे यांनी मराठा आरक्षण प्रकरणी भाजप बुथ प्रमुख पदाचा नुकताच राजीनामा दिला असून ते सन २००९ पासून ते आजतागायत भाजप बुथ प्रमुख पदावर कार्यरत होते.
त्यांनी पक्ष वाढीसाठी अहोरात्र कष्ट घेतले.परंतु मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल केली त्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करून लोहकरे यांनी बूथ प्रमुख पदाचा राजीनामा दिला.यावेळी उपसरपंच रावसाहेब लोहकरे म्हणाले की काल मला भाजप कार्यालयातून पक्षाच्या मोर्चा बांधणीसाठी फोन आला असता मी त्यांना किती दिवस मराठा बांधवांना फसवायचे असे विचारले व आम्ही मनोज जरांगे पाटील यांना उपोषणास पाठिंबा म्हणून गावांमध्ये उपोषण करणार आहोत माझ्या गावात पुढार्यांना नेत्यांना गाव बंदी करण्यात आलेली आहे असे यावेळी सुनावले.